- धुळे तालुक्यातील पुरमेपाडा शिवारात शेतकऱ्याने आपल्या शेतामध्ये जनावरांपासून आपल्या शेतीचे रक्षण व्हावे या उद्देशाने शेतीच्या आजूबाजूला तार कंपाऊंड केले होते आणि या तार कंपाऊंड मध्ये रात्रीच्या वेळेस करंट सोडून जंगली जनावरांपासून शेतीचे रक्षण करीत होते.
मात्र रात्रीच्या वेळेस ओंकार माळीच हा शेतकरी आपल्या बकऱ्यांसाठी चारा घेण्यासाठी गेला असता करंट सोडलेल्या तार कंपाऊंड ला त्याचा स्पर्श झाल्याने जागीच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मागील गेल्या काही दिवसांपूर्वी धुळे तालुक्यातील चितोळ येथे देखील अशीच घटना घडली होती आणि आता पुन्हा पुरमेपाडा येथे दुर्दैवी घटना घडली आहे.
अशा प्रकारे शेतामध्ये करंट सोडणे हा कायद्याने गुन्हा असून पुरमेपाडा येथील या घटने प्रकरणी संबंधित शेतमालकाविरोधात सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी यावेळी दिली.

टिप्पणी पोस्ट करा